40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता वर्धेत न्यायाधीशांपुढे साक्ष सुरू असताना चाकू हल्ला

वर्धेत न्यायाधीशांपुढे साक्ष सुरू असताना चाकू हल्ला

0
61

blank

वर्धा,–वर्धा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांच्या न्यायालयात महिला वकील योगिता मुंन (४०) यांच्यावर भीम गोविंद पाटील (८०) याने चाकू हल्ला केला. यात महिला वकील गँभीर जखमी झाली. या घटनेची वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना आज २२ रोजी दुपारी १ वाजता घडली.मिळालेल्या माहितीनुसार, भीम पाटील यांची दोन वर्षांपासून पुलगाव न्यायालयात खटला सुरू होता. तू माझ्याविरोधात खटला का लढते म्हणून यापूर्वी याच वृद्धाने ऍड. मुन यांच्यावर पुलगाव येथे चाकू हल्ला केला होता. त्या प्रकरणी पुलगाव येथे गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला सुरूसु होता. आज त्या प्रकरणाची अंतिम सुनावणी वर्धा न्यायालयात सुरू असताना चक्क न्यायाधीशांपूढेच चाकू हल्ला करण्यात आला. वर्धाa पोलिसांनी पाटील यांना ताब्यात घेतले असून जखमी वकील मुन यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

blank