34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महायुवा ॲप’चे अनावरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महायुवा ॲप’चे अनावरण

0
38

मुंबई, दि. २५:- शासकीय योजना, रोजगार संधी आणि पदवीधर तरुण यांच्यादरम्यान दुवा ठरू शकेल अशा ‘महायुवा’ ॲपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवन समिती सभागृहात अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस तसेच सूरज चव्हाण, मिलिंद साटम आदी उपस्थित होते.

blank

या ॲपवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीत माहिती असेल. पदवीधर या ॲपवर आपले प्रोफाईल तयार करतील. त्यांच्याकडील विशेष प्राविण्य व आवडीचे क्षेत्र याबद्दलची माहिती अपलोड करेल. या आधारे त्याला उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली जाईल.

blank