38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Featured News कोका अभयारण्यात टी १६ व पेंच व्याघ्रप्रकल्पात B2 वाघिणीचे दर्शन

कोका अभयारण्यात टी १६ व पेंच व्याघ्रप्रकल्पात B2 वाघिणीचे दर्शन

0
46

blank

नागपूर/भंडारा- तब्बल दोन वर्षांनंतर वन्यप्रेमींना भंडारा शहरालगत असलेल्या कोका अभयारण्यात टी १६ वाघिणीचे दर्शन झाले असून वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या पेंच व्याघ्रप्रकल्पात सुध्दा शनिवार(दि.26)ला B2 या वाघीणीचे दर्शन व्याघ्रप्रेमींना झाले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता श्रीकांत ईरावार यांनी या वाघीणीच्या वेगवेगळ्या मुद्रा आपल्या कॅमेरात कैद केल्या आहेत.

blank
दोन वर्षाआधी टी १0 म्हणजेच मस्तानी ही वाघीण आपल्या पिलांसोबत कोका वन्यभ्रमंतीला जाणार्‍या पर्यटकांना नेहमीच दिसायची. कोरोनाचा काळ व नंतर मागील दोन वर्षात कोका अभयारण्यात वाघिणीचे दर्शन होत नव्हते. यामुळे कोकाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते. नुकतेच भंडारा येथील वन्यप्रेमी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्रॉफर दीपक चड्डा जंगल सफारीला गेले असता त्यांना टी १६ या वाघिणीचे दर्शन झाले. कोका वन्यजीव अभयारण्यात टी १३ हा नर वाघ नेहमीच दिसून येतो. पण पहिल्यांदाच कोका येथे टी १६ ला आपल्या कॅमेरात दीपक चड्डा यांनी टिपले आहे.
पर्यटकांना झालेले टी-१६ चे दर्शन ही आनंदाची पर्वणी ठरली असून कोका वन्यजीव अभयारण्यात सफारीला आता सुगीचे दिवस येतील, अशी आशा इथल्या निसर्गप्रेमी व गाईड लोकांनी व्यक्त केली. टी १६ वाघिणीसोबत बछडे असून येणार्‍या काळात वन भ्रमंती करणार्‍यांना नक्कीच या व्याघ्र परिवाराचे दर्शन घडून येईल असे सूत्रांनी सांगितले.

 

blank