41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News आंतरराष्ट्रीय उड्डाणांची बुकिंग 30 टक्क्यांनी वाढली; दोन वर्षांच्या उड्डाणबंदीनंतर पुन्हा मोकळे आकाश

आंतरराष्ट्रीय उड्डाणांची बुकिंग 30 टक्क्यांनी वाढली; दोन वर्षांच्या उड्डाणबंदीनंतर पुन्हा मोकळे आकाश

0
22

blank

कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे रविवारपासून सुरू होत आहेत. विमानतळ प्राधिकरणाने मास्क अनिवार्य करण्यासह कंपन्या, प्रवासी-कर्मचाऱ्यांसाठी जागा रिक्त ठेवणे, पीपीई किट घालणे आदी निर्बंध उठवले आहेत. यादरम्यान एअर इंडियासह देशी आणि अनेक परदेशी कंपन्यांनी आपली नियमित उड्डाणे सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या बुकिंगमध्ये ३० टक्के आणि चौकशीत १७० टक्के वाढ झाली आहे.

इजमायट्रिपचे अध्यक्ष हिमांक त्रिपाठी यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाण बुकिंगमध्ये व्ही-शेप रिकव्हरीची अपेक्षा वर्तवली. ते म्हणाले, आमच्या प्लॅटफाॅर्मवर तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग ४०-५० टक्के वाढली आहे. मेकमायट्रिपचे सीईओ विपुल प्रकाश म्हणाले, ९६ टक्के उड्डाणांचा सर्च उन्हाळी सुट्यांसाठी केला जात आहे. भारतीय नागरिक दुबई, थायलंड, मालदीव, श्रीलंका, लंडन, पॅरिस आदी ठिकाणी जाऊ इच्छितात. थॉमस कुक (इंडिया) चे अध्यक्ष राजीव काळे म्हणाले, एप्रिल ते जूनदरम्यान समर व्हॅकेशन बुकिंग २५ ते ३५ टक्के जास्त आहे.

याशिवाय चौकशीदेखील १७० टक्के वाढली आहे. बहुतांश उड्डाणे व डेस्टिनेशनची बुकिंग पश्चिम युरोप, स्वित्झर्लंड, फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रिया, इटलीसह यूके, यूएसएसाठी होत आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे महाराष्ट्र, दादरा, नगर हवेली, दमण विभागाचे अध्यक्ष जितेंद्र केजरीवाल सांगतात, भारतात युरोप हॉलिडे सीझन आहे. निर्बंधांमुळे मध्यपूर्वेत जाण्याचे लोक टाळत आहेत.

अनेक देशांच्या कंपन्या पुन्हा सुरू करताहेत उड्डाणे
अमिरात १ एप्रिलपासून दुबई ते भारत १७० आठवडी उड्डाणे बहाल करेल. ब्रिटनची व्हर्जिन अटलांटिक १ जूनपासून लंडन-दिल्ली (रोज) उड्डाण सुरू करेल. या मार्गावर यांचे दुसरे उड्डाण. थाई एअरवेज उन्हाळ्यात भारतासाठी ३५ आठवडी उड्डाणे सुरू करेल. अमेरिकन एअरलाइन्स वर्षअखेरीस सिएटल-बंगळुरू उड्डाण सुरू करेल. फिनएअर दिल्ली-हेलसिंकी, मुंबई-हेलसिंकी तीन नवी उड्डाणे सुरू करेल. जर्मन लुफ्थांसाचे २९ एप्रिलपासून चेन्नई-फ्रँकफर्ट आठवड्यात ३ उड्डाणे.

blank