42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता बुटी फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला जोरदार धडक ; तीन जण जखमी

बुटी फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला जोरदार धडक ; तीन जण जखमी

0
29

blank

चंद्रपूर दि २७ मार्च- ट्रक व दुचाकीची जोरदार धडक होऊन तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार सकाळी १० वाजता चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील सावली तालुक्यातील वाघोली बुटी फाट्याजवळ घडली. दिपक मुकुंदा मॅकलवार, रा. व्याहाड (बुज) आणि नेताजी मादाळे व कैलास कन्नाके दोघेही रा. वाकल असे जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली वरून एमएच ३३ ४३६० या क्रमांकाचे ट्रक जात होते तर व्याहाड (बुज) वरून तीन युवक गडचिरोली येथे दुचाकीने कामासाठी येत होते. वाघोली बुटी फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील तिन्ही युवक १० ते १२ मिटर अंतरावर फेकले गेले. तिन्ही गंभीर जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून उपचार सुरु आहे. अपघात होताच ट्रकचालक ट्रक सोडनू फरार झाला आहे.

blank