
चिचगड,दि.31ः गोदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून .नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा.याकरिता जिल्हा परिषद शाळा चिचगड येथे कमांडेड कार्यालय क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र आरा जसपुर यांच्यातर्फे दहावी व बारावी पास युवकांसाठी सुरक्षा रक्षक व, सुरक्षा सुपरवायझर पदाकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यात 542 युवकांनी भाग घेतला,त्यामधून 75 युवक भरती प्रक्रियेकरीता पात्र झाल्याने त्या उमेदवारांची बौद्धिक व लेखी चाचणी घेण्यात आली. त्यात ५३ उमेदवार यांना एस .आय. एस . गार्ड सुपरवाजर मध्ये घेण्यात आले आहे .या कार्यक्रमाला पोलीस उप अधीक्षक अशोक बनकर , पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत देवळेकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन पोलीस निरीक्षक अजय भुसारी ठाणेदार चिचगड, सहायक पोलिस निरीक्षक शरद पाटील, तसेच मार्टिन ,लक्ष्मण घरत, नंदकिशोर पटले, ब्रिजलाल मरस्कोले ,रेखा धुर्वे ,आशिष बंजारी ,चंद्रशेखर गणवीर ,विष्णू राठोड ,हे पोलीस कर्मचारी व एसआयएसचे डी.एन.सिन्हा,सुधीर पटले उपस्थित होते.





