गोरेगांव:-तालुक्यातील मुंडीपार येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत(उमेद) क्रांती ग्रामसंघात 20 मार्च ते 04 एप्रिल कालावधीत पोषण आहार पखवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात किशोरवयीन मुली,गर्भवती महिला,स्तनदा माता इत्यादींना आरोग्य पोषण, स्वच्छता,रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, संतुलित आहार या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली.
गर्भवती महिलांमध्ये 60% रक्तक्षयाचे प्रमाण दिसून येते.त्यांचे वजन सुद्धा कमीच असते, त्यामुळे जन्माला येणारी नवजात शिशू ब-याचदा अशक्त व कमजोर जन्मतः कुपोषित असतात.म्हणुन बालमृत्यू व मातामृत्यु टाळायचे असतील तर किशोरवयीन मुलींचे रक्तक्षय उपचार करणे खुप आवश्यक आहे.त्यासाठी कुटुंबातील लोकांनी सुद्धा आरोग्याविषयी साक्षर होणे गरजेचे आहे.तसेच पौष्टिक आहारात हिरव्या पालेभाज्या,फळे,गाजर,कंदमुळे इत्यादींचा सेवन करणे आवश्यक आहे.
असे प्रतिपादन सीटीसी कन्व्हर्शन वर्षा पटले यांनी यावेळी केले.यावेळी सीसी लिभाष घरडे,कृषीव्यवस्थापक राजेश चौधरी , ग्रामसंघ अध्यक्ष माधुरी बोमले,ग्रामसंघ कोषाध्यक्ष पुजा पारधी,कृषीसखी ज्योती ठाकुर, एफ.एल.सीआरपी भामेश्वरी राहांगडाले, दुर्गा राहांगडाले, बॅंकसखी वैशाली चौधरी,सीआरपी शिला चौधरी,धृवकला राहांगडाले, शारदा राऊत,लेखापाल आम्रपाली राऊत,साखरे, स्तनदा माता,गरोधर माता व किशोरवयीन मुली उपस्थित होते.





