.-कास्ट्राईब शिषक संघटनेचे अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
गोंदिया,दि.02ः- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल पूर्वी मार्च २०२२ चे सर्व शिक्षक/कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात यावे या मागणीचे निवेदन १ एप्रिल ला कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया चे अध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना देण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल जन्मदिवस उत्सव म्हणून संपूर्ण देशात मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “भारतीय चलनाच्या समस्या” ( THE PROBLEM OF THE RUPEE) ग्रंथ भारतीय रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरण्यात आला. बाबासाहेबांनी सुचवलेली मार्गदर्शक तत्वे, कार्यप्रणाली, संकल्पना, रूपरेषेवर १ एप्रिल १९३५ ला भारतीय रिजर्व बँके ची स्थापना होऊन भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डौलाने उभी आहे.
त्या ज्ञानसूर्याच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती १४ एप्रिल २०२२ पूर्वी सर्व शिक्षक/ कर्मचारी/अधिकाऱ्यांचे मार्च २०२२ महिन्याचे वेतन करण्याची मागणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १४ एप्रिल २०२२ पूर्वी मार्च चे वेतन करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, सौ.उमा गजभिये, अजय शहारे, आशिष वंजारी, उत्क्रांत उके, अमित गडपायले, अविनाश गणवीर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





