इडीने काय हाक मारली, इंजिनने ट्रॅकच बदलली

0
27

 भुजबळांचे राज ठाकरेंवर शरसंधान

मुंबई,दि.03- शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचेही नाव घेतले होते.

पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या वरही निशाणा साधला. दरम्यान, यावर बोलताना छगन भुजबळ यांनी ते पाहिल्यानंतर ती मनसेची जाहीर सभा होती की भाजपची होती, हेच समजले नसल्याचे म्हणत टोला लगावला .

“राज ठाकरे बोलतात चांगले म्हणून लोक बघायला जातात. परंतु, ते पुढे जे वागतात ते लोकांच्या लक्षात येत नाही . म्हणून कार्यकर्त्यांना ही आपल्या इंजिनचे तोंड कोणत्या दिशेला आहे, हे कळत नाही,” असा टोला ही त्यांनी लगावला .
भाजपचा प्रचारच ते करत होते. ते फक्त भाजपचे झेंडे वगैरे लावले नव्हते. बाकी सर्वकाही तसेच होते. त्यांनी आपला ट्रॅक बदलला, पण भाजप त्यांना घेते का हे पाहावे लागणार असल्याचेही भुजबळ म्हणाले.