आमदारांच्या घरासाठी ‘भीक मांगो’,ओबीसी क्रांती मोर्चाचे लक्षवेधी आंदोलन

0
23

भंडारा,दि.04ः- राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना घरकुलाच्या लाभासाठी वणवण भटकंती लागत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 300 आमदारांना मुंबई येथे घरे बांधून देण्याची घोषणा केली.पुर्वीपासूनच भरमसाठ मानधन,अनेक भत्ते,पेन्शन,आमदार निवासस्थान असतानाही आमदारांच्या गरजा भागत नसतील तर आम्ही भीक मांगून त्यांच्या गरजा पूर्ण करणार असे म्हणत ओबीसी क्रांती मोर्चातर्फे आज 4 एप्रिल रोजी भंडारा शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले.राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्य नागरिक, गोरगरिब शेतकरी, विद्यार्थी व बेरोजगारांचे कोणतेही प्रश्न सुटू शकलेेले नाही.प्रत्येक कुटुबाला पक्के घर असावे,याकरिता घरकूल योजना राबविली जात आहे.अनेक गरजू लाभार्थ्यांचे घरकूल यादीतून नाव वगळण्यात आले. काही लोकांचे घरकूल मंजूर झाले.परंतु राज्य शासनाने वेळेवर निधी न दिल्याने बांधकाम रखडले आहे.असे असताना कोट्यवधी रुपयांची संपती असलेल्या व सर्व सुख सुविधांचा उपभोग घेत असलेल्या आमदारांना सरकारतर्फे मुंबईत घर देण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेला एकही नेत्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही.गोरगरिब नागरिक, शेतकरी व शेतमजूरांचा प्रश्न मार्गी लागत नसताना,पोलिस,आरोग्य कर्मचारी,वन कर्मचारी राज्य कर्मचा-यांसाठी सरकार जवळ पैसा पै नसताना, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्वृती मिळत नसताना तसेच आमदार निवास असतानी सुद्धा आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा करणे ही लज्जास्पत बाब असल्याचे ओबीसी क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले. यावेळी आमदारांना दारिद्र रेषेखालील अंत्योदय राशन कार्डची सोय उपलब्ध करून द्यावे व एवढे करूनही आमदारांच्या गरजा भागत नसतील तर त्यांच्याकरिता ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने जनतेला ते भीक मागून निधी संकलित केला जाईल व तो निधी मुख्यमंत्र्यांना पाठविला जाणार असल्याचे ओबीसी क्रांती मोर्चाचे संयोजक तथा अध्यक्ष संजय मते यांनी सांगितले. याकरिता आज भंडारा शहरात भिक्षाही मागण्यात आली.
यावेळी विनोद चौधरी, भाऊ कातोरे, नागेश माकडे,डे देविदास ठवकर, रमेश लांडगे, होमेश्वर लांजेवार, पुरुषोत्तम ठवकर,प्रमिला शहारे,आकाश कारेमोरे,शंकर कारेमोरे, निखिल सावरकर, आनंदराव मेश्राम, संजय वाघमारे, महेश ईलमकर, ज्ञानेश्वर मेश्राम, निकेश टेंभुणे आदी उपस्थित होते.