31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र संविधानाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना मिळालेले आरक्षण न्यायव्यवस्थेमुळे धोक्यात-रमेश बारसकर

संविधानाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना मिळालेले आरक्षण न्यायव्यवस्थेमुळे धोक्यात-रमेश बारसकर

0
34

तुळजापूर,दि.06ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना दिलेले आरक्षण सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे धोक्यात आले आहे. रस्त्यावरची लढाई लढून आता गेलेलं आरक्षण परत मिळवावे लागेल अन्यथा येणाऱ्या पिढ्या आपणाला माफ करणार नाहीत. त्यामुळे ज्योतीक्रांती परिषदेच्या वतीने राज्यभर काढण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या रथयात्रेत प्रत्येक ओबीसी बांधवाने आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करीत जे राज्यकर्ते ओबीसींचे आरक्षण काढतील त्यांच्या खुर्च्या काढून घेऊ असा खणखणीत इशारा आरक्षण रथयात्रेचे संयोजक तथा ज्योतीक्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिला.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र व राज्यातील सरकार वेळकाढूपणा करत असल्यामुळे दोन्ही शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ज्योतीक्रांती परिषदेच्या वतीने राज्यव्यापी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ 5 एप्रिलला (मंगळवार ) तुळजापूर येथून करण्यात आला. त्यावेळी झालेल्या सभेत रमेश बारसकर बोलत होते.

यावेळी बोलताना रमेश बारसकर म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या सर्व संपत्तीचे समान वाटप करण्याचा निर्णय झाला होता. मात्र देशातील धनदांडग्या लोकांनी याला विरोध केला. भगतसिंग ,राजगुरू आणि सुखदेव यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्याप्रमाणे क्रांतिकारी लढा उभारला त्याच प्रमाणे ओबीसी बांधवांना गेलेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी लढा उभा करावा लागेल. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा लढा डोळ्यासमोर ठेवावा लागेल. देशातील विविध जातीसमूहांचा समावेश ओबीसी मध्ये केला गेला आहे मात्र देशात जातीनिहाय जनगणना झाली नसल्याने नेमकी आकडेवारी कळू शकत नाही. देशातील ओबीसींची लोकसंख्या बावन्न टक्क्यांच्या कैक पुढे गेली आहे .असे असताना सुद्धा ओबीसींचे आरक्षण जाणं ही दुर्दैवी बाब आहे. देशात पशु -पक्षांची जनगणना होते मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही यापेक्षा हे दुर्दैवी आहे. ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाल्यास ओबीसी समाजाला राजकारण आणि शिक्षण या क्षेत्रात आरक्षण मिळेल आणि हा समाज सुधारेल .आणि नंतर हा समाज कोणालाच भीक घालणार नाही या भीतीपोटी ओबीसींची स्वतंत्र जनगणना केली जात नाही. बहुसंख्येने असलेला समाज आज एकटा पडलेला आहे त्यामुळे यापुढील काळात ओबीसी समाजाने ज्योती क्रांती परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची गरज आहे.

यावेळी बोलताना जुबेर शेख म्हणाले की, रमेश बारसकर यांच्यासारख्या बहुजन नायकाच्या नेतृत्वाखाली राज्यभरात काढण्यात येणाऱ्या ओबीसी आरक्षण यात्रेत सहभाग नोंदवणे हे प्रत्येक ओबीसी बांधवांनी आपले आद्य कर्तव्य समजावे. ओबीसी समाजाची वज्रमूठ आवळल्या शिवाय आरक्षण मिळणे शक्य नाही याचे भान आता सर्वच ओबीसी बांधवांनी ठेवायला हवे.blank

यावेळी या कार्यक्रमासाठी मारूती रोकडे, निलंगा नगरपरिषदेचे सभापती शरद पेठकर,उस्मानाबाद ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी,लोहर नगरपरिषद नगरसेवक अविनाश माळी,सावता परिषद जिल्हाउपाध्यक्ष महादेव माळी,ज्योती क्रांती परिषद पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अतूल क्षिरसागर,प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर,उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी,कार्याध्यक्ष लोमेश काळे,ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विकी घुगे,बाळासाहेब चिकलकर,सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाड़े,बाळू भाले,संजय शितोळे,तुळजापूर तालुकाध्यक्ष नितिन माळी,कार्याध्यक्ष महेश म्हेत्रे,नागनाथ म्हेत्रे,धनाजी म्हेत्रे,सोमा माळी,सागर अष्टुळ,बाळासाहेब माळी,सुलतान पटेल,श्रीकांत गाढवे,सिद्धार्थ एकमल्ले आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काटी येथे ओबीसी संघर्ष यात्रा आली असता गावातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी काटी येथील दत्त चौकात रथयात्रेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून गावातून रथयात्रा फेरी काढण्यात आली.आयोजित सभेच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.विशेष म्हणजे या या रथयात्रेत सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते व त्यांनी या रथयात्रेस आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी आदेश कोळी (सरपंच ),सुजित हंगरकर(उपसरपंच)अशोक जाधव(मा.सरपंच),लोमेश काळे कार्याध्यक्ष,मारुती रोकडे,भैरूनाथ काळे,बाळू भाले,शिवलिंग घाणे,अविनाश वाडकर,सयाजी देशमुख,सिद्धीनाथ ढगे,सचिन काळे,उमाजी गायकवाड,तानाजी हजारें,संतोष काळे,जुबेर शेख इतर मान्यवर व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.