जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संघटनात्मक चर्चा

0
9

गोंदिया ,दि.१२ :: गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय संघटन बैठक शनिवारी (दि.९) पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यात संघटन वाढविण्याविषयी आपसात चर्चा केली.
सभेला उपस्थित प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटन वाढविण्याकरिता प्रत्येक कार्यकर्ताने सामान्य माणसापर्यंत संपर्क करणे आवश्यक असल्याचे म्हटले. वेळेचे महत्व जाणून वरिष्ठांनी ठरविलेल्या कार्यपद्धतीला अनुसरुन काम करावे लागेल. फक्त निवडणुकीच्या काळात संघटनेची सक्रियता दाखवून चालणार नाही, तर नियमितपणे संघटनेच्या कामात वेळ देण्याची तयारी प्रत्येक कार्यकर्त्यांने ठेवावी असे आवाहन केले.
येणार्‍या काळात सहकार क्षेत्राचा, नगर परिषदेच्या, नगर पंचायतीच्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केल्यास पक्षाला यश मिळेल याची खात्री व्यक्त केली. यावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्‍वरी, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा महिला अध्यक्षराजलक्ष्मी तुरकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी मांडले. संचालन जिल्हा परिषद पक्षनेता गंगाधर परशुरामकर यांनी केले. आभार शहर अध्यक्ष शिव शर्मा यांनी मानले. जिल्हा बैठकीत मंचावर प्रामुख्याने अर्बन बँक अध्यक्षमहेश जैन, कृउबास समिती देवरीचे सभापती रमेश ताराम, अशोक गुप्ता, डॉ. अविनाश काशीवार, किशोर तरोणे, अशोक शहारे, ओबीसी सेल अध्यक्ष बबलू कटरे, कुंदन कटारे, पंचम बिसेन, राजकुमार एन. जैन, दुर्गा तिराले, सुशीला भालेराव, रवि मुंदडा, लता रहांगडाले, उषा किंदरले, हिरालाल चव्हाण, घनश्याम मस्करे, छाया चव्हाण, खुशबू टेंभरे, आशा पाटील, रमेश चुर्‍हे, सुखराम फुंडे, भोजराल चुलपार, मनोज डोंगरे, सुमन बिसेन, कैलास पटले, भाष्कर आत्राम, विणा पंचम बिसेन, ललीता चौरागडे, सुनीता मडावी, रिता लांजेवार, जियालाल पंधरे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, देवचंद तरोणे, प्रभाकर दोनोडे आदी मंचावर उपस्थित होते.
सभेत सुरज गुप्ता, केवल बघेले, केतन तुरकर, सुरेश हर्षे, नामदेव डोंगरवार, कमलबापू बहेकार, दिनेश अग्रवाल, नानू मूदलीयार, हरीचंद मोटवानी, रामकुमार असाटी, रजनी गौतम, किशोर पारधी, मनोहर वालदे, ममता बैस, छाया कटरे, शाहीन मिर्जा यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.