
गोरेगाव,दि.09ः तालुक्यातील बाम्हणी व बबई येथे मातोश्री पांदण रस्ता योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी नयना गुंडे,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी आज 9 मे रोजी केली. ग्रामपंचायत बाम्हणी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या नाला सरळीकरण व इतर कामांची पाहणी केली.तर बबई येथे पांदण रस्त्याची पाहणी करुन मजुरांशी सवांद साधला.यावेळी बाम्हणी सरपंच गीताताई बिसेन,बबई सरपंच सोमेश रहागंडाले, गटविकास अधिकारी उइके,तहसलिदार गोस्वामी,विस्तार अधिकारी टी.एन.बिसेन, तलाठी एस. टी. अंबादे,का. अ. बघेले,हरीश जि कटरे,ग्रामसेवक टेंभरे व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.




