33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ निवडणुकीच्या नावावर जिल्हा प्रशासनाने केली चहानास्त्याची दुकाने बंद

निवडणुकीच्या नावावर जिल्हा प्रशासनाने केली चहानास्त्याची दुकाने बंद

0
87

गोंदिया,दि.10ः गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज 10 मे रोजी निवडणुक होऊ घातली आहे.त्या पार्श्वभूमिवर सुरक्षेच्या नावावरच जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाने रखरखत्या उन्ह्यात झाडाच्या कानोसाल्या असलेल्या चहापान टपरीच्या दुकानमालकांवर दंडुका उभारत ती दुकानेच बंद ठेवली आहेत.विशेष म्हणजे यापुर्वी अनेकदा निवडणुका पार पडल्या मात्र या दुकानांना कधीच बंद करण्यात आले नव्हते,त्यातच बाहेरुन येणारे विविध पक्षाचे कार्यकर्ते नव्हे तर नेते सुध्दा या दुकानावर बसून चहा नास्ता घेत चर्चा करत बसायचे.मात्र आज होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने दुकाने बंद करुन निवडणुकीसाठी येँणारे जिल्ह्यातील नागरिकांना थंड पाण्यासोबतच चहा नास्ता करण्यापासून वंचित ठेवण्याचेच काम केले की काय अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.निवडणुक ही जिल्हा परिषदेच्या सभागृहात असल्याने मुख्य मार्गावरील झेड सेक्युरीटीसारखे बंदोबस्त कशासाठी हा सुध्दा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला असून जिल्हाप्रशासनाच्या या भिषण गर्मीमध्ये घेतलेल्या भूमिकेचा अनेकांना निषेध नोंदवला आहे.blank