
मुंबई,दि.13ःज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने मंगळवार दिनांक 17 मे 2022 मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी भव्य आशा एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चा करता राज्यभरातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजुट दाखवण्याचे आवहान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले.
आज मुंबई येथे मराठी पत्रकार संघ याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.ओबीसींचे गेलेले राजकीय आरक्षण परत मिळावे तसेच केंद्रसरकारने यासाठी कायदा करावा यासह अन्य मागण्याकरिता समाजाचा आक्रोश शासन दरबारी मांडण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमाना दिली.यावेळी पनवेलचे द्वरकादास पाटील प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर,ईशान खरकदारी आदीजण उपस्थित होते.




