41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home रोजगार/व्यापार नक्षल चवळीला बळी न पडता पोलिस दलाच्या सहकार्याने विकास साधावा

नक्षल चवळीला बळी न पडता पोलिस दलाच्या सहकार्याने विकास साधावा

0
24

blank

गडचिरोली-नागरिकांनी गडचिरोली पोलिस दलामार्फत राबविण्यात येणार्‍या ‘पोलिस दादालोरा खिडकी’ च्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे. नक्षलवाद्यांच्या खोट्या वळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलिस दलाच्या सहकार्याने आपला विकास साधावा. जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी पोलिस दलामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी केले.
गडचिरोली दलाच्या पोलिस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून १२ मे रोजी उपपोलिस स्टेशन पेरमिली येथे भव्य जनजागरण व कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत होते. कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अमोल ठाकरे, सीआरपीएफचे पोलिस निरीक्षक आशीत रंजन दास, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, तर प्रमुख अतिथी म्हणून पेरमिलीच्या सरपंचा किरण नैताम, माजी सरपंच प्रमोद आत्राम, शंकर दुर्गे, शंकर कुंभारे, श्रीनिवास बंडमवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू बोमांवार, मैत्री संस्थेच्या अल्का तलांडी, अहेरीचे कृषी सहायक प्रशांत राऊत, उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपपोस्ट पेरमिली येथे ‘आमची पोषक परसबाग’ या उपक्रमाचे, मत्स्य तलावाचे व सिनेमा हॉलचे उद््घाटन करण्यात आले. तसेच भाजीपाला लागवडीवर आधारीत मराठी व गोंडी भाषेतील माहिती पुस्तिकेचे प्रकशन करून कृषी विभाग व आत्मा यांच्या मार्फत चालविणार्‍या योजनांची माहिती शेतकर्‍यांना देण्यात आली. तसेच आधुनिक पद्धतीचे भाजीपाला लागवड प्रशिक्षण देण्यात आले. मेळाव्या पेरमिली परिसरातील नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.