31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ धान खरेदी सुरू करून मयार्दा वाढवून द्या

धान खरेदी सुरू करून मयार्दा वाढवून द्या

0
46

गोरेगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन झाले असून शासनाने त्वरित शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करून धान खरेदी करावी व त्यात एकरी १६ क्विंटल धान खरेदीची मयार्दा वाढवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांनी केली आहे. शासनाने रब्बी धान खरेदी करण्यासाठी फेडरेशनला क्विंटलची र्मयादा ठरवून दिली आहे. तर दुसरीकडे यंदा रब्बी उत्पादन भरपूर प्रमाणात झाल्याने शेतकन्यांना व्यापार्‍यांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात खरिपानंतर उन्हाळी धानाची लागवड केली जाते व मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आणि सिंचन प्रकल्पात पाणी शिल्लक असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात यावर्षी वाढ झाली. रब्बीसाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने धानाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. मार्केटिंग फेडरेशन परिपत्रकानुसार किमान आधारभूत धान खरेदी प्रति शेतकर्‍यांना एकरी ८ क्विंटल धान खरेदी करण्याचे पत्रात नमूद असल्याने क्षेत्रातील धान उत्पादक शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. जिल्ह्यातील ५८१२0 शेतकन्यांनी अधिकृत नोंदणी केली आहे. पण महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत येण्याआधी एकरी १६ क्विंटल धान खरेदी करण्यात येत होती. मात्र स्वत:ला शेतकन्यांचे नेते म्हणवणारे सत्तेत आले आणि एकरी ११ व १३ क्विंटल धान खरेदी केली. परंतु यावेळी शेतकर्‍यांवरील अन्यायाचे कळस गाठत फक्त एकरी ८ क्विंटल धान खरेदी करण्याची मयार्दा आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.