
वडसा ,दि.१७: गडचिरोली जिल्ह्हयातील कोरची नागपूर मार्गावरच वृत्तपत्र घेऊन जाणार्या पेपर गाडीवर परतीच्या मार्गावर असताना कुरखेडा शंकरपूर दरम्यानच्या जंगलात बिबटयाने हल्ला केल्याची घटना आज मंगळवारला सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान घडली.या हल्यात गाडीचालक प्रकाश बोबडे जखमी झाल्याने त्याच्यावर कुरखेडा येथे प्राथमिक उपचार करुन नागपूरला हलविम्यात आले आहे.





