33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जेवणाच्या सुट्टीत युनियन बॅंकेचे लावतात दार

जेवणाच्या सुट्टीत युनियन बॅंकेचे लावतात दार

0
47

ग्राहक त्रस्त: कर्मचारी मस्त, एसीच्या हव्यात मारतात गप्पा

गोंदिया: शहराच्या बालाघाट रोडवरील बोपचे चाळ येथे असलेल्या युनियन बॅंकेचे कर्मचारी दुपारी जेवणाच्या वेळेत ग्राहकांना बॅंकेत येण्यासाठी मज्जाव केला जात आहे. त्यामुळे भर उन्हात ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. १८ मे रोजी दुपारी २ ते ३ वाजता हाच प्रकार घडला. या बॅंकेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आत प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे ग्राहकांत व बॅंकेच्या कर्मचाऱ्यांत चांगलीच जुंपली. नेहमीच या बॅंकेच्या ग्राहकांसोबत कर्मचारी वाईट व्यवहार करतात. बॅंकेचे कामकाज करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना सहकार्य करीत नाही. बॅकेचे मॅनेजर अनेकदा बॅंकेत हजर राहात नाही. बॅंकेच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी इर्री येथील उपसरपंच रवी तरोणे यांनी केली आहे.