41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home राजकीय शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या सोयी पुरविण्याची जबाबदारी शासनाचीच – काॅ. हिवराज उके

शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या सोयी पुरविण्याची जबाबदारी शासनाचीच – काॅ. हिवराज उके

0
32

blank

   भंडारा -: सर्वांना समान व मोफत शिक्षण, रोजगार, नोकऱ्या व उत्तम आरोग्य यांच्या सोयी पुरविण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे राज्य व केंद्र शासनाचीच आहे असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे जिल्हा समन्वयक कॉम्रेड हिवराज उके यांनी एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
        दिनांक 7, 8 व 9 मे ला कोका- जंगल, तालुका जिल्हा भंडारा येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ( एआयएसएफ) या विद्यार्थी संघटनेचा तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आला होता.
 दिनांक 7 मे ला संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रितेश धारगावे यांच्या अध्यक्षतेखाली काॅ. हिवराज उके यांनी शिबिराच्या फलकाचे फक्त कापून व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उद्घाटन केल. व उद्घाटन भाषण केले. तत्पूर्वी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष काॅ. सदानंद इलमेे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व एआयएसएफ का पैगाम-सबको शिक्षा सबको काम, हो गरिब या धनवान- सबको शिक्षा- एक समान, इन्कलाब जिंदाबाद, संविधान का पैगाम – सबको शिक्षा एक समान,  भगतसिंग, गांधी, आंबेडकर के देश मे धर्म के झगडे नही चलेंगे, हमे युद्ध नही – शांती चाहिये इत्यादी घोषणा देण्यात आल्या.
    क्रांती गीताने शिबिराची सुरुवात करण्यात आली. शिबिराचे संचालन व प्रस्तावना एआयएसएफ चे उपाध्यक्ष व शिबिराचे संयोजक वैभव चौकर यांनी केले.
      तीन दिवसीय शिबिरामध्ये विविध विषयावर प्रबोधन पर मार्गदर्शन झाले. त्यात – इंग्रजी बोलण्याची कला व पद्धत- इंजि. कुमारी चेतना उके, समाजसुधारकांचा परिचय – एडव्होकेट सविता बेदरकर, ऐतिहासिक व द्वंवात्मक भौतिकवाद- प्रा. डॉ. सुनील चवळे, नवीन शैक्षणिक धोरण – डॉक्टर सतीश शंभरकर, मार्क्सवादी तत्त्वज्ञान – काॅ. सदानंद इलमे,एआयएसएफ चा इतिहास – वैभव चोपकर व संघटनात्मक बांधणी काॅ.हिवराज उके   यांचा समावेश होता. शिबिराला डॉ.बाळकृष्ण सार्वे, दिलीप ढगे इंजि. सचिन कारेमोरे इ.नी शुभेच्छा दिल्या. सर्व पाहुण्यांना व विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच नवीन शैक्षणिक धोरण ही दोन पुस्तके भेट देण्यात आली.
    दिनांक 9 मे ला सायंकाळी 5 वाजता  प्रितेश धारगावे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड हिवराज उके तसेच कॉम्रेड भाऊराव गिरेपुंजे, इंजिनियर चेतना उके, मीनाक्षी मेहर मंचावर विराजमान होते. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरा संबंधी आपले मनोगत व्यक्त केले व राज्य शिबिरासाठी जाण्याची तयारी दर्शविली. आणि शेवटी शिबिर संयोजक वैभव चोपकर यांनी सर्वांचे आभार मानले व क्रांती गीताने शिबिराची सांगता करण्यात आली.