33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home रोजगार/व्यापार ११ दिवसीय स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर शहारवानी येथे संपन्न

११ दिवसीय स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर शहारवानी येथे संपन्न

0
29

blank

गोरेगाव,दि.22ः- फोरम फॉर अकॅडेमिक इक्विलिटी , गोंदिया व स्कॉलर प्री. प्रायमरी स्कूल शहारवानीच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, विविध अभ्यासक्रमांची व व्यवसायाच्या संधींची माहिती व्हावी व ग्रामीण विद्यार्थ्यात आत्मविस्वास निर्माण व्हावा या उद्देशाने ११ दिवसीय स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर ११ ते २१ मे २०२२ काळात स्कॉलर प्री. प्रायमरी स्कूल शहारवानी येथे करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन विध्यार्थ्यांना लाभले. जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपेशकुमार राऊत यांनी प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर मार्गदर्शन केले. महिला बालविकास अधिकारी प्रियांका किरणापुरे यांनी एमपीएस सी (राज्यसेवा आयोगाच्या) परीक्षांच्या अभ्यासक्रम, पुस्तके व तयारीची पद्दत यावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शक केले .सेवानिवृत्त आयएएस अधिकारी पद्माकर लामघरे यांनी विध्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणजे काय याची जाणीव करून दिली. सहाय्यक आयुक्त संजय थूल यांनी आत्मविश्वास व परिश्रमाने यश कसे संपादन करता येत यावर मार्गदर्शन केले.चिप लोको निरिक्षक रवींद्र नेमाने,  यांनी रेल्वे मधील विविध पदांची , परीक्षांची , परीक्षांच्या तयारीची पद्धत यावर मार्गदर्शन केले. अनिल रामटेके (आई.आर.एस.एस. ) मुख्य सामग्री प्रबंधक , पश्चिम रेल्वे , मुंबई यांनी सकारात्मक विचार व कृतीतुन जीवन कसे बदलता येत व भविष्य घडविता येत यावर मार्गदर्शन केले. धनंजय वंजारी (आई. आर. एस. ) अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी , भारत सरकार, नागपूर यांनी – यू.पि.एस.सी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी. विशेतः विद्यार्थ्यांना मुलाखत कशी द्यायची याची तयारी कशी करावी यावर मार्गदर्शन केले. अरविंद डोंगरे, शिक्षणाधिकारी (निवृत्त), नागपूर यांनी शिक्षण क्षेत्रातील बदल व विद्यार्थ्यांची तयारी या विषयावर मार्गदर्शन केले. तेजेंद्र मेश्राम सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबई यांनी राज्यसेवा परीक्षांची तयारी कशी करावी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रा. धर्मवीर चौहान यांनी वेळेचे यावस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. विनोद माने, शिक्षक गोंदिया यांनी विध्यार्थ्यांना मराठी व्याकरण , व सुंदर अक्षरे कशी काढावीत यावर मार्गदर्शन केले.दिगंबर गोपचे संचालक डायमंड अकादमी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षातील यशोगाथा यावर मार्गदर्शन केले .
या स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन शिबिराच्या समारोप सत्रात मुख्य मार्गदर्शक म्हणून उमेश नागदेवे , सहायक संचालक, प्रादेशिक कार्यालय (डी .टी . इ ) , औरंगाबाद , कार्यक्रमाचे अध्यक्ष शहारवानी ग्रामचे सरपंच सचिन मेश्राम , प्रमुख अतिथी  सुरेश नेवारे त.मु.स. अध्यक्ष ,माजी सरपंच  दीप्तीताई पटले,विनोद पटले, पाणलोट समिती अध्यक्ष , राजेश पटले , कार्यक्रमाचे मुख्य संयोजक धर्मवीर चौहान मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी सर्व थोर महापुरुषाच्या फोटोला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलित करून व भारतीय राज्यघटनेचे सामुदायिक पठाण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात अली. आपल्या प्रास्ताविकात फोरम फॉर अकॅडेमिक इक्विलिटीचे मुख्य संयोजक धर्मवीर चौहान यांनी फोरम द्वारे संचालित विध्यार्थी उपयोगी उपक्रमांची माहिती दिली तसेच शिबिराचा उद्धेश उपस्थितांना सांगितला. १२ विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपले अभिप्राय व मनोगत व्यक्त केले. उमेश नागदेवे यांनी विध्यार्थ्यांना या प्रसंगी १० वी , १२ वी, पदवी व पद्युत्तर विविध शिक्षणाच्या संधीं यावर मार्गदर्शन केले.
या शिबिराच्या आयोजनात मोलाचे सहकार्य करणाऱ्या मीना दिलीप पटले, भारती उईके,पूजा भावे यांचा सत्कार फोरम द्वारे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या शिबराचा ६८ विध्यार्थ्यांनि लाभ घेतला
या कार्यक्रमाचे सूचारू संचालन स्वाती पटले व आरजू हटीले यांनी केले तर आभार प्रदर्शन पूनम पटले यांनी केले . या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना साठी फोरम फॉर अकॅडेमिक इक्विलिटी चे मुख्य संयोजक धर्मवीर चौहान,स्कॉलर प्री. प्रायमरी स्कूल, शहारवानीच्या मुख्याध्यापक शीतल चौहान,मीना पटले,भारती ऊईके,पूजा भावे,कल्पना चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. तर ग्राम प्रशासनातील पदाधिकारी व पालक यांचे सहकार्य लाभले.

blank