
(विपुल परिहार)मोहाडी,दि.27 ः भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील तुमसर रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील उसर्रा गावाजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात सायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज 27 मे 2022 रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. रामेश्वर गौतम राहणार झारिया तालुका कटंगी जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश असे जखमीचे नाव आहे.
कटंगी तालुक्यातील जखमी रामेश्वर गौतम मोटार सायकल क्रमांक एमएच 40 बीएल ०४०९ या गाडीने नागपूर येथून काम आटोपून गावाकडे जात असताना उसर्रा गावाजवळील पुलासमोरील मुरमाचा ढिगावरून कोसळल्याने अपघात झाला. यात कंबरेला मोठा मार लागला असून हेल्मेट घातल्यामुळे डोक्याला मार लागला नाही,मात्र गंभीर जखमी झाला.घटनेनंतर जखमीला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे नेण्यात आले. रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात घडत आहेत. दहा दिवसा अगोदर याच घटनास्थळी एका तरुणाचा जीव गेलेला होता. आज झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रामेश्वर गौतम या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती आंधळगाव पोलिसांना दिल्यानंतरही घटनास्थळावर दोन तास उशीराने पोचले.