32.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश औरंगाबादच्या डॉक्टर दाम्पत्याचा उत्तराखंडमध्ये अपघात:बालरोग तज्ज्ञ डॉ. अलका एकबोटे यांचे निधन

औरंगाबादच्या डॉक्टर दाम्पत्याचा उत्तराखंडमध्ये अपघात:बालरोग तज्ज्ञ डॉ. अलका एकबोटे यांचे निधन

0
64

औरंगाबाद,दि.30ः येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ अलका एकबोटे यांचे अपघातात निधन झाले आहे. त्या बजाज रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ आणि क्लिनिकल व मोलिक्युलार जेनेटिक्स प्रमुख म्हणून काम करत होत्या. उत्तराखंडमध्ये गंगोत्रीजवळील त्यांच्या गाडीचा अपघात झाला, अशी माहिती बजाज हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नताशा वर्मा यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. गेल्या 14 वर्षांपासून त्या बजाज रुग्णालयात कार्यरत होत्या.

डॉ. नताशा वर्मा म्हणाल्या की, डॉ. एकबोटे यांच्या गाडीचा मध्यरात्री अपघात झाला. या गाडीत डॉ. अलका एकबोटे यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. व्यंकटेश एकबोटे देखील होते. ते सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय एमजीएम हॉस्पिटलमधील प्रसूती तज्ज्ञ डॉ. अनुप्रिया महर्षी जखमी झाल्या आहेत. या गाडीत आणखी काही प्रवासी असून तेदेखील जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये औरंगाबादच्या इतर डॉक्टरांचा समावेश आहे. जखमींवर डेहराडूनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

उत्तराखंडमध्ये मध्यरात्री हा अपघात झाला.
उत्तराखंडमध्ये मध्यरात्री हा अपघात झाला.