गोंदिया,दि.१०-कधी काळी आयएसओ प्रमाणपत्र नावाजलेली गोंदिया जिल्हा परिषद सध्या कोट्यवधी रुपये खर्चून नववधूसारखी सजवली जात असली तरी या प्रशासकीय इमारतीमध्ये येणार्या आगंतुकांच्या वाहनामुळे वाहन कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.अधिकारी कर्मचारी, जिल्हा परिषद सदस्य,कंत्राटदार,शिक्षक,सामान्य नागरिक आपल्या चारचाकी वाहनाने जेव्हा जिल्हा परिषदेच्या परिसरात प्रवेश करतात,तेव्हा आपल्या वाहनाला योग्य आणि वाहनामुळे इतरांना त्रास होणार नाही,याची काळजी न घेताच वाहन पार्किंग करीत असल्याने वाहन कोंडी होत असल्याचे चित्र अनेकदा बघावयास मिळते.आज बुधवारला सुध्दा जिल्हा परिषदेत चारचाकी वाहनाने आलेल्या आगंतुकांनी आपली वाहने रस्त्यावर व मध्यभागी लावल्याने इतर वाहनचालकांना आत येतांना व बाहेर जातांना कर्णकर्कश आवाजाचे हार्न वाजविण्याची वेळ आलेली होती.अशा या बेशिष्त वाहन पार्किंगवर जिल्हा परिषद प्रशासन कधी आळा घालणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.