काँग्रेसच्या नव्या धोरणानुसार राहुल बोंद्रे यांनी दिला राजीनामा..

0
24

बुलडाणा-राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबीरात एकापेक्षा जास्त पद असलेल्या पदाधिकाऱ्यांना तसेच ‘एक व्यक्ती एक पद’ व ‘एक व्यक्ती ५ वर्षापेक्षा जास्त एका पदावर राहणार नाही,’ हा नवीन नियम लागू केल्यानंतर राज्यातील दोन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यात आज २ जुन रोजी शिर्डी येथे झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सुध्दा आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे.राहुल बोंद्रे दोन वेळा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले असून त्यांचा कार्यकाळ ५ वर्षापेक्षा जास्त झाला होता. या नवीन नियमानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना दिला असल्याची माहिती आहे.