गोंदिया पंचायत समितीच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिन उत्साहात

0
28

गोंदिया,दि.06ः- येथील पंचायत समितीच्या प्रांगणात ” शिव स्वराज्य दिन ” साजरा करुन ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्र निर्माते लोककल्याणकारी राजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ होय.या दिवशी महारादजांचे राज्याभिषेक झाले. हा दिवस शिव स्वराज्य दिन म्हणून पाळण्यात येत आहे.
या निमित्ताने आज पंचायत समिती गोंदियाच्या प्रांगणात पं.स. सभापती मुनेश राहांगडाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी राजकुमार पुराम होते.यावेळी पं.स.सदस्य शंकर टेंभरे, गट शिक्षणाधिकारी जे एस राऊत,विस्तार अधिकारी आर.जे. बन्सोड, सौ.एस.जे.अग्रवाल,अहिल्याबाई खोब्रागडे,रेखा पारधी, दुबे मॅडम, केंद्र प्रमुख केदार गोटेफोडे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एल.यु.खोब्रागडे यांनी केले.