गोंदिया,दि.08ः जिल्ह्याची जीवनदायीनी व सद्य:स्थितीत नामशेष (लुप्त) होण्याच्या मार्गावरील पांगोली नदीचे पुनरूज्जीवन, संवर्धन, संरक्षण व विकास करण्यासाठी जिल्हाप्रशासन स्तरावरून विकास आराखडा तयार करण्यात यावे.सोबतच नदी वाचवण्यासाठी पाण्याची सिंचनक्षमता वाढविण्यात यावे या मागणीचे निवेदन 07 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना पांगोली नदी वाचवा अभियान कृती समितीसह समाजोन्नती बहु. ग्रामीण व शहरी विकास संस्थेच्या वतीने देण्यात आले.जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी निवेदनावर कार्यवाही करण्यात येईल व पांगोली विषयाला न्याय देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. निवेदन देतेवेळी समाजोन्नती बहु. ग्रामीण व शहरी विकास संस्थेचे सचिव तिर्थराज ते. उके,फुलचूरचे सरपंच मिलन रामटेककर,चुलोदचे सरपंच लतीश बिसेन,अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष एम.ए.ठाकूर,एँड.ओम मेठी,ग्रामपंचायत सदस्य सुकचंद येळे, जनशक्ती बहु. सामाजिक संगठनेचे अध्यक्ष अनिल शरणागत, संगठक रामनाथ बिसेन,माजी उपसरपंच अशोक चन्ने , सामाजिक कार्यकर्ते जगदीश राहांगडाले,विजयकुमार कावळे,ज्ञानेश्वर पटले,राजेश देशकर,विलास गौतम,अशोक बिसेन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.