गोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने तालुकास्तरीय संघटनात्मक निवडणुकांना घेवून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा पार पडली. स्थानिक शहिद भोला भवन येथे आयोजित सभेत जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी विजय चोपडा हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शहिद भोला भवन भवन येथे काँग्रेस कार्यालयात ३ जून रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्य अतिथी म्हणून काँग्रेसचे जिल्हा निवडणूक प्रभारी विजय चोपडा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, आ.अभिजित वंजारी, आ.सहेसराम कोरोटे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या गोंदिया जिल्हा अंतर्गत येण्यार्या सर्व तालुकांच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यासंबंधी सभेत चर्चा करण्यात आली. करिता जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व तालुका अध्यक्ष तसेच इतर संघटनेचे महिला, युवा, सेल, प्रâंटल, आघाडी, विभाग, डिजिटल विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सुचना करण्यात आल्या.