बीजीडब्लू रुग्णालयात दीड महिन्याच्या मुलाचा लसीकरणानंतर मृत्यू

0
50

आत्ता तरी अधिकारी फोटोशेसनला सोडून कामावर लक्ष देणार काय

गोंदिया,दि.08, शहरातील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात आज, 8 जून रोजी लसीकरणानंतर काही तासातच एका दीड महिन्याचा बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मृत बालकाच्या पालकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रुग्णालय प्रशासन आणि दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शहरातील मामा चौक परिसरात राहणार्‍या शारदा बंसत बोरकर या आपल्या दीड महिन्याच्या रोहन बसंत बोरकर या मुलाला लसीकरणाकरीता आज सकाळी 11 वाजता रुग्णालयात घेऊन आल्या होत्या. रुग्णालयात उपस्थित परिचारिकांनी त्यांच्या मुलाला दीड महिन्यानंतर दिली जाणारी रोग प्रतिकारक लस दिली. त्यानंतर रुग्णालयात काही वेळ थांबून त्या घरी जात असताना वाटेतच मुलाचे हृदयाचे ठोके बंद असल्याचे त्यांना जाणवले.त्यामुळे  त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठले असता डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. यानंतर पालकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.विशेष म्हणजे, मात्र सकाळी याच रुग्णालयात जवळपास 27 चिमुकल्यांचे लसीकरण करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्वस्थ होती. मात्र या बालकाला पोलिओचा डोस देताना परिचारिकेकडून बाळाचे नाक दाबले गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे.

याप्रकरणात मृत बालकाच्या उत्तरीय तपासणीनंतर जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शासकिय जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी बी.डी.जायस्वाल यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे या रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकारी हे आपल्या शासकीय कामाकडे लक्ष देण्याएैवजी फोटोशेसनला अधिक महत्व देत असून काही संस्था सुध्दा त्या फोटोसेशन डाँक्टरांना कधीही त्यांच्याकामाबद्दल विचारतांना दिसून येत नाही.उलट आपल्या कार्यक्रमात त्यांच्याशिवाय आपल्या फोटोला महत्व नाही,असेच करुन काम करीत असल्याचे चित्र शासकीय वैद्यकीय महाविद्याय व जिल्हा रुग्णालयाचे झाले आहे.