देवरी,दि.10 – येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त स्थानिक सुरभि चौकातील तालुका कार्यालयात तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली आमगाव विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख रमेश ताराम यांच्या हस्ते पक्ष ध्वजाजे ध्वजारोहण करण्यात आले.
या वर्धापनदिनानिमित्त अनेक युवकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष गोपाल तिवारी, ज्येष्ठ नेते भय्यालाल चांदेवार, तालुका उपाध्यक्ष सचिन भेंडारकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष पारबता चांदेवार, माजी नगराध्यक्षा सुमन बिसेन, शहर अध्यक्ष मुकेश खरोले, तालुका सचिव सुजीत अग्रवाल, नगरसेवक पंकज शहारे, गोटाबोडी सरपंच मनोहर राऊत, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष हिमांशू ताराम, शहर अध्यक्ष सारंग देशपांडे, ज्येष्ठ रविकांत बडवाईक, दिनेश गोडशेलवार, युगेश बिसेन, अरविंद शेंडे, योगेश मेश्राम, नगरसेविका हिना टेंभरे, मंजूषा वासनिक, शारदा उईके, लक्ष्मी मेश्राम, शशीकला टप्पे, पुष्पा चौधरी, तुलाराम मेश्राम, रवि मेश्राम, कैलास टेंभरे, प्रशांत देसाई, अरुण आचले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मुकेश खरोले यांनी केले असून उपस्थित सर्वांचे आभार सुजीत अग्रवाल यांनी मानले.