शिरेगाव बांध येथे राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याचे अनावरण

0
23

अर्जुनी मोरगाव-तालुक्यातील सिरेगाव बांध येथे गोंडवाना आदिवासी समाज संघटनेच्यावतीने स्थानिक बिरसा मुंडा सभागृहात राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.महिला फोरमच्या तालुकाध्यक्ष नाशिका कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे ध्वजारोहण गोंडवाना महासभेचे राष्ट्रीय सचिव दिवाकर पेंदाम त्यांनी केले.या सोहळ्याचे मूर्तिपूजक बिरसा क्रांती दल गोंदियाच्या मालती कीनाके,हेमलता आहाके आणि तुळशीदास कोडापे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, माजी सरपंच दादा संग्रामे,जयपाल तुलावी चंद्रप्रकाश येल्ले,मनोहर चीमनकर उपस्थित होते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याचे माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी पेंदाम यांनी समाज बांधवांना एकसंघ होऊन समाजसेवेचे कार्य करा.बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांचे विचार आचरणात आणा. आदिवासींनी शिक्षण घेऊन समाज क्रांतीची ज्योत पेटवावी. सामाजिक एक्क्यातून आदिवासींचे हक्क अबाधित राखण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरालाल सयाम,संचालन आणि आभार सचिन वाढवे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोंडवाना आदिवासी समाजाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.