
भंडारा :- केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी व राहुल गांधी हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल. ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले त्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खोट्या व बनावट प्रकरणात त्यांना अडकवण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचा आवाज दडपण्याचा भाजपा सरकार प्रयत्न करत आहे पण अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भिक घालत नाही. जनता सरकारनेही इंदिरा गांधी यांच्याविरोधात अशीच कारवाई केली होती, आता भाजपा सरकार तेच करत आहे पण अहंकारी, अत्याचारी भाजपा सरकारसमोर काँग्रेस कदापी झुकणार नाही.हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे, असा सणसणीत इशारा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिला आहे.
सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून दडपशाही करणा-या केंद्र सरकारविरोधात काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री बोरकर,युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे,सभापती रमेश पारधी,सभापती मदन रामटेके,सभापती स्वाती वाघाये यांच्या नेतृत्वात विश्राम भवन भंडारा येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालय जवळ त्रिमूर्ती चौकापर्यंत धडक मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. या वेळी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष सौ जयश्री रविन्द्र बोरकर, भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी, प्रदेश महासचिव जिया भाई पटेल, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद चे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, जिल्हा परिषद सभापति रमेश पारधी,जिल्हा परिषद सभापती मदन रामटेके, सभापती स्वाती वाघाये, नारायण वरठे,आवेश पटेल, धनराज साठवणे,धनंजय तिरपुडे, प्यारेलाल वाघमारे , राजकपूर् राउत,विनीत देशपांडे, प्रशांत देशकर ,गायत्री वाघमारे, अजय मोहनकर शंकर तेलमासरे, गणेश लिमजे,पृथ्वी तांडेकर, जीवन भजनकर, भरत खंडाइत, राजू निर्माण, शंकर तेलमासरे, राजेश हटवार, प्रेम वनवे, आकाश काकडे, विजय देशकर, मंजूषा चौहान, गायत्री वाघमारे , शीतल राउत, कुंदा आगसे, मनीषा निंबार्ते, मनीषा हलमारे, प्रिया खंडारे, प्रणाली सार्वे, सारिका नागदेवे संजय चौधरी ,सोहेल अहमद, अनीक जमा पटेल, जय डोंगरे, योगेश गायधने , विजय देशकर ,महेंद्र वाहने ,जीवन भजनकर ,सचिन फाले , आवेश पटेल, शिवा गायधने,पवन मस्के,आकाश बोंद्रे, श्रीकांत बनसोड ,प्रफुल शेंडे, कमल साठवणे, धर्मेंद्र गनवीर,स्नेहन रोगडे, प्रफुल गायधने, परवेज नाहिद, संजय सार्वे, गोविंद हुकरे, तुलशिराम बिलवाने,चंद्र शेखर बनकर राजुभाउ भूरे, राकेश तांडेकर, विजय सार्वे, आलोक बँसोड,व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.