जि.प. सदस्या लक्ष्मी तरोणे यांच्या प्रयत्नाने इर्री येथे बोअरवेल मंजूर

0
29
गोंदिया,दि.17ः तालुक्यातील इर्री येथील ताराचंद नागपुरे यांच्या घराजवळ जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी रवि तरोने यांच्या प्रयत्नाने बोअरवेल मंजूर करण्यात आली.इर्री येथील ताराचंद नागपुरे यांच्या घराजवळ बऱ्याच वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या होती. या बाबत गावकऱ्यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मी तरोने यांना प्रत्यक्ष भेटून व निवेदन देऊन बोअरवेलची मागणी केली असता या प्रकरणी जिल्हा परिषद मधून तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रस्तुत ठिकाणी विहित कालावधीत बोअरवेलची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. व संबंधित विभागाच्या अधिनस्त यंत्रणेने वेळीच दखल घेऊन बोअरवेलची व्यवस्था केली. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलेली आहे. या बाबत जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी तरोने यांचे गीताबाई नागपुरे, दुर्गाबाई ठकरेले, अजवंतीबाई उपवंशी,सखाराम मडावी,महेश नागपुरे, अर्जुन नागपुरे, भाऊलाल तरोने, तुळशीराम ठकरेले, चुंन्नीलाल नागपुरे, महेंद्र दमाहे, चैतराम नागपुरे, रवि तरोने, भाऊलाल तरोने, देविलाल चौधरी,रवि ठकरेले,लक्षीराम उपवंशी, जियालाल नागपुरे, ओमकार नागपुरे, मुलचंद चौधरी, श्रीकिशन पाथोडे, इसन पाथोडे, पन्नालाल बनोटे, ताराचंद नागपुरे, धुरनलाल दमाहे, मोतीलाल नागपुरे, मितलेस नागपुरे, योगराज दमाहे, नंदकिशोर नागपुरे, सुरजलाल चुटे, मनिराम उपवंशी, दिनेश दमाहे, रेखलाल दमाहे, सुंदरलाल नागपुरे, यांनी शब्द सुमनानी
अभिनंदन केले आहे.