आमगाव,दि.17ः म.रा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पूणे अंतर्गत नागपूर विभागीय बोर्ड नागपूरच्या वतीने, मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा निकाल लागला असून तालुक्यातील छत्रपती विद्यालय सितेपारचा निकाल 100 टक्के लागला आहे.येथील 54 विद्यार्थीपैकी 54 विद्यार्थी उतिर्ण झाले.यात 37 प्रविण्य प्राप्त विद्यार्थी, 15 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 02 विद्यार्थी द्वितिय श्रेणीत आले.विद्यालयातून रोहित देवराव बिसेन (91.80%) हा विद्यार्थी प्रथम आला.तर कु. तृप्ती ढालचंद हरिनखेडे (88.80%) व्दितीय,विकास दिनेश कावळे (88%)तृतीय आला.त्याचप्रमाणे कु. दुर्गेश्वरी सोयेंद्र बिरनवार (87%),. कोमल दिलेश्वर मेश्राम (86.80%)
,कु. दिपल आसाराम चौधरी (86.80%),कु.कंचन हंसराज रिनाईत (86.20%),जयकुमार हौसलाल बरैय्या (85.80%),तेजराम बलाराम गौतम (85.80%),कु. आचल धनलाल पटले (85.60%),कु. साक्षी घनश्याम बिसेन (85.40%) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संत गाडगे महाराज शिक्षणसंस्था सितेपार संस्था अध्यक्ष श्रीमती चौधरी,मा.चौधरी(कार्यवाह)तसेच संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.