
अर्जुनी-मोर -महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे निकालाची परंपरा कायम ठेवत सरस्वती विद्यालय अर्जुनी-मोरचा निकाल शंभर टक्के लागला असून कुमारी प्रांजली संजय बहेकार या विद्यार्थिनीने 98. 40 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.सरस्वती विद्यालयातील अठरा विद्यार्थी 90% च्या वर गुण घेऊन यशस्वी ठरले.प्राविण्य श्रेणी 101 विद्यार्थी व प्रथम श्रेणीत 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नगरवासीयांकडून अभिनंदन होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य अनिलकुमार मंत्री व संस्थाध्यक्ष वल्लभदास भुतडा तसेच संस्था सचिव सर्वेश भुतडा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील विद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षकांना दिली आहे.