वसतिगृहात १९ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

0
40

 गोंदिया-स्थानिक मामा चौक येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात एका विद्यार्थिनीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेमुळे वसतीगृहात एकच खळबळ उडाली. ही घटना  (ता.२५) दुपारदरम्यान उघडकीस आली. वर्षा कुवरलाल मसे (१९) रा.नवरगाव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. उल्लेखनिय असे की, वर्षा मसे हिने काल आपल्या मैत्रिणीसोबत वाढदिवस साजरा केला होता.
स्थानिक मामा चौक येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात नवरगाव येथील वर्षा कुंवरलाल मसे ही विद्यार्थिनी ४ वषार्पासून राहून शिक्षण घेत होती. काल (ता.२४) वर्षाचा वाढदिवस होता. या निमित्त तिने वसतीगृहातील मैत्रिणीसोबत वाढदिवस साजरा केला. (ता.२५) सकाळी वसतीगृहातील विद्यार्थिनी परिक्षा देण्यासाठी बाहेर पडल्या. दरम्यान वर्षा ही वसतीगृहाच्या एका खोलीत होती. विद्यार्थिनी परीक्षा देवून वसतीगृहात परत आल्यावर खोलीचे दार बंद दिसून आले. दरम्यान विद्यार्थिनींनी दार ठोठावून वषार्ला हाक दिली. मात्र खोलीतून कसलाही मिळाला नाही. यामुळे विद्यार्थिनींनी वार्डनला याची माहिती दिली. वार्डन देखील अनेक प्रयत्न केले मात्र कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दार तोडून खोलीत प्रवेश केला असता वर्षा मसे ही फासावर टांगलेली आढळली. यावरून वषार्ने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. वर्षाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. तर दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच तिच्या कुटूंबियांनी वसतीगृह गाठून हंबरडा फोडला. या घटनेमुळे वसतीगृहात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. वर्षाने आत्महत्या का केली असावी? असा प्रश्न तिच्या मैत्रिणीपुढेही निर्माण झाला आहे.