
मुंबई,दि.30ः- गेले काही दिवस, या राज्यातील काही आमदार आसाम राज्यात गेले होते. एक तर राज्याचे नेतृत्व बदलण्याची त्यांची इच्छा असावी. आसाममध्ये जे सहकारी गेले आणि त्यांचे ज्यांनी नेतृत्व केले मला वाटत नाही की त्यांची अपेक्षा ही उपमुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक होती. पण भाजपामध्ये एकदा आदेश आला की त्याच्यामध्ये तडजोड नसते. हा आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर आली. याची कल्पना कोणालाही नव्हती. कदाचित शिंदे यांना नव्हती.
दुसरं आश्चर्य म्हणजे, या कार्यपद्धतीमध्ये आदेश एकदा दिल्यानंतर तो तंतोतंत पाळावा लागतो. त्याचं उदाहरणं म्हणजे जे मुख्यमंत्री होते, नंतर विरोधी पक्षाचे नेतृत्व केलं त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्याचा धक्का होता.पण एकदा नागपूरातील आरएसएसचा व पक्षाचा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते, याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले.
एकदा मुख्यमंत्रीपदावर गेल्यानंतर त्याच यंत्रणेतील अन्य पदं स्वीकारण्याची उदाहरणं महाराष्ट्रात यापूर्वी होती. माझ्या मंत्रीमंडळामध्ये शकंरराव चव्हाण अर्थमंत्री होते. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मी मंत्री होतो. पण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा शंकरराव माझ्या मंत्रिमंडळात आले. शंकरराव यांच्यानंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते, पुढे ते मंत्री झाले. अशोकराव चव्हाण सध्याचे जे मंत्री होते आमचे सहकारी होती, तेदेखील मुख्यमंत्री होते. अशी उदाहरणं महाराष्ट्रात घडलेली आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची स्वीकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही.
सातारा जिल्ह्याला लॉटरी लागली- शरद पवार
आताचे मुख्यमंत्री झाले ते ठाण्याचे प्रतिनिधी आहेत. अनेक वर्षे त्यांचे ठाणे जिल्ह्यात काम आहे. पण ते मूळ सातारा जिल्ह्यातील आहेत. योगायोग असा आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री साताऱ्याचे होते. मी मुख्यमंत्री झालो. माझे मूळ गावा साताऱ्यात आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील होते. आता एकनाथ शिंदे हेदेखील सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सातरा जिल्ह्याला लॉटरील गालली असे म्हणावे लागेल.
शिंदे यांच्याकडून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम व्हावे- शरद पवार
एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी पडली आहे. माझं त्यांचं बोलणं झालं. त्यांना मी शुभेच्छा दिल्या. एकदा शपथ घेतल्यानंतर तो राज्याचा प्रमुख होतो. राज्यातील सर्व विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून काम व्हावे, अशी माझी अपेक्षा आहेत. त्यासाठी मी त्यांना अंत:करणातून शुभेच्छा.