महाराष्ट्राला मिळाला सर्वांत तरुण विधानसभा अध्यक्ष, कोण आहेत राहुल नार्वेकर?

0
46

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास पाहता सर्वांत तरुण असा अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभेला मिळाला आहे. राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे आहेत. भाजप-शिंदे गटाला 164 मते पडली आहेत. तर मविआ उमेदवार राजन साळवी यांना 107 मते पडली आहेत. समाजवादी पक्षाचे दोन आमदार आणि एमआयएमचा एक आमदार तटस्थ राहिले आहेत. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेले.

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षांची निवडीसाठी मतदान झाले. यावेळी राहुल नार्वेकर यांनी 57 मतांनी मविआचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. यापूर्वी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष काँग्रेस नेते नाना पटोले हे होते.

भाजपने विश्वासास पात्र ठरणारे आणि शिवसेना व्हाया राष्ट्रवादी व्हाया भाजप असा राजकीय प्रवास करणारे राहुल नार्वेकर हे कोण आहेत, याबद्दल आपण जाणून घेऊया. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपची वाट धरली होती. सेनेत असताना आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

कुटुंबही राजकारणात
राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. तर राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. तर भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. राहुल यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.

शिंदे सरकार परीक्षेत पास
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर राज्यात शिंदेशाहीला सुरुवात झाली आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला 4 तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, शिंदे सरकारची खरी परीक्षा आज होती. कारण, अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारने बाजी मारल्यानंतर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध झाले. त्यानंतर उद्या विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता असेल. त्यामुळे शिंदे सरकारची खरी परीक्षा आज झाली.

आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष

क्रम निवडणूक वर्ष विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री
पहिली विधानसभा 1960 सयाजी सिलम यशवंतराव चव्हाण (काँग्रेस)
दुसरी विधानसभा 1962 त्र्यंबक शिवराम भारदे ऊर्फ बाळासाहेब भारदे भारदे मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक (काँग्रेस)
तिसरी विधानसभा 1967 त्र्यंबक शिवराम भारदे वसंतराव नाईक (काँग्रेस)
चौथी विधानसभा 1972 एस.के. वानखेडे, बाळासाहेब देसाई वसंतराव नाईक (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
पाचवी विधानसभा 1978 शिवराज पाटील
प्राणलाल व्होरा
प्राणलाल व्होरा वसंतदादा पाटील (काँग्रेस)
शरद पवार (बंडखोर काँग्रेस)
राष्ट्रपती राजवट
सहावी विधानसभा 1980 शरद दिघे ए.आर. अंतुले (काँग्रेस)
बाबासाहेब भोसले (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
सातवी विधानसभा 1985 शंकरराव जगताप शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस)
आठवी विधानसभा 1990 मधुकरराव चौधरी शरद पवार (काँग्रेस)
सुधाकरराव नाईक (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस)
नववी विधानसभा 1995 दत्ताजी नलावडे मनोहर जोशी
नारायण राणे (शिवसेना
दहावी विधानसभा 1999 अरूण गुजराथी विलासराव देशमुख
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
अकरावी विधानसभा 2004 बाबासाहेब कुपेकर विलासराव देशमुख
अशोक चव्हाण (काँग्रेस)
बारावी विधानसभा 2009 दिलीप वळसे-पाटील अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
तेरावी विधानसभा 2014 हरिभाऊ बागडे देवेंद्र फडणवीस (भाजप)
चोदावी विधानसभा 2019 नाना पटोले (कॉग्रेस )नरहरी झिरवाळ]] (राष्ट्रवादी ) हंगामी अध्यक्ष 4 फेब्रुवारी 2021 पासून देवेंद्र फडणवीस (भाजप),
उद्धव ठाकरे (शिवसेना)
एकनाथ शिंदे (शिवसेना)