
धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेपासून कुणीही हिरावू शकत नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे. सत्तांतरानंतर ठाकरे प्रथमच पत्रकार परिषदेला संबोधित करत आहे. शिवसेनेला कुणीही धोका पोहोचवू शकत नाही. त्यामुळे नवीन चिन्हाबाबत विचार करण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, वारकऱ्यांनी मला पंढरपूरला पुजेसाठी बोलावले आहे. एकदा राजकारणाचा गदारोळ संपल्यानंतर आपण पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोर्टाच्या निकालाची चिंता नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येईल, याबाबत चितां नाही
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रसार माध्यमांशी संवाद – LIVE https://t.co/xJSz2dy2mV
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) July 8, 2022




