क्षेत्रभेटीत आमदार मनोहर चंद्रिकापुरेनी ऐकून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या

0
24

अर्जुनी मोर,दि.09- अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रातील आमदार मनोहर चांद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहूरकुडा, बुटाई, तिबेट कॅम्प, गोठणगाव, खैरी/सुकळी या गावांना भेटी देऊन लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
याचवेळी महागाव ते बूटाई मुख्य रस्त्याची दुरुस्ती व रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदारांसमोर मांडली. यासोबतच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सुरळीत करण्याची मागणीही करण्यात आली. तर आमदार चांद्रिकापुरे यांनी गावकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेऊन लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. परिसरातील प्रत्येक लहान-मोठ्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असल्याचे आमदार म्हणाले. या भागातील प्रत्येक समस्या मी विधानसभेच्या पटलावर ठामपणे मांडत आहे. कारण परिसराचा सर्वांगीण विकास हे आमचे प्रथम प्राधान्य आहे.यावेळी प.स. सदस्य आम्रपाली डोंगरवार, माजी जि प सदस्य रतीराम राणे, निर्मलाताई ईश्वर, अजय शहारे, यशवंत शहारे, वाघमारे, संजय ईश्वर, उरकुडा किरसान, हरीचंद घरत, मंदाताई गावडकर,विनोद किरसान,
यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.