मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक, 3 मोटारसायकल जप्त

0
52

तिरोडा, दि.10 : गोंदिया शहर येथील DB पथकाच्या मदतीने तिरोडा पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्‍या गुन्हेगारास अटक केली. त्या गुन्हेगाराजवळून 3 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.सविस्तर असे की, पोलीस स्टेशन तिरोडा हद्दीत मोटारसायकल चोरी जाण्याच्या घटना घडत होत्या. याला अंकुश लावण्याकरिता आणि घडलेले गुन्हे उघड करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष चमूची स्थापना केली आहे. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणारे गुन्हेगार यांना तपासून त्यांची सर्वोतोपरीने सखोल तपासणी करणे, हदीत आकस्मिक नाकाबंदी करून मोटारसायकलचे कागदपत्रे तपासणी सुरु केली आहे.त्यानुसार गोंदिया शहर येथील DB पथक यांची मदत घेऊन त्यांच्यासोबत पेट्रोलिंग करीत असताना त्यामध्ये नामे पारस भाकचंद चांदणी चौक गोंदिया येथे एक व्यक्ती विना नंबरची मोटारसायकल चालविताना मिळून आला. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव भालेकर (वय 34) रा. लक्ष्मीनगर,  गौतम बुद्ध वॉर्ड, गोंदिया असे सांगितले. त्याच्या ताब्यातील मोटारसायकलचे कागदपत्रे विचारले असता तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. त्यामुळे त्याच्यावर संशय  आल्याने अधिक विचारपूस करण्यात आली. त्यामध्ये त्याने हदीतील मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. त्याचे कबुलीवरून खालील मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. 68 हजार रूपायनहा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हेगाराकडून आणखी मोटारसायकल जप्त होण्याची शक्यता आहे.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी, सोबत पोलीस हवालदार सुरेश टेम्भरे, नापोशि विनोद लांडगे, नीलकंठ रकसे, पुंडलिक उके, चोपकर यांनी केलेली आहे.