34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home रोजगार/व्यापार महिला व युवतींकरीता सॉफ्टवेअर प्रोग्रामींग निवासी प्रशिक्षण

महिला व युवतींकरीता सॉफ्टवेअर प्रोग्रामींग निवासी प्रशिक्षण

0
41

blank

 गोंदिया,दि.13 : अमरावती व नागपूर विभागातील 17 ते 28 वयोगटातील कोणत्याही शाखेतून बारावी पास (विज्ञान, कला अथवा वाणिज्य), आय.टी.आय., पॉलिटेक्निकचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिला व युवतींकरीता ‘ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामींग’चे 18 महिन्याचे निवासी प्रशिक्षण डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती येथे राबविण्यात येणार आहे. पालक शासकीय क्षेत्रातील नोकरीत असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

         प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये : प्रशिक्षण कालावधी 18 महिने, नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण कालावधीमध्ये लॅपटॉप दिले जाईल, प्रशिक्षीत व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन, संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकासावर भर, प्रशिक्षण व मुल्यमापनानंतर नामांकीत कंपनी/स्टार्ट अप मध्ये रोजगाराची हमी.

           प्रशिक्षणार्थीची निवड प्रमाणित केलेल्या विहीत निवडप्रक्रियेद्वारे करण्यात येणार असून याकरीता सर्वप्रथम चाळणी परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम इयत्ता दहावी पर्यंतचे इंग्लिश व गणित यावर आधारीत आहे. विद्यार्थी सदर परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने देऊ शकतात. ऑनलाईन परीक्षेचा कालावधी 10 ते 30 जुलै 2022 राहणार आहे. ऑफलाईन परीक्षा 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत अमरावती आणि नागपूर विभागातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्यात येत आहे.

          सदर प्रशिक्षणामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या महिला व विद्यार्थीनींनी https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSexiA-UIEoVAPVdhTNCoBhl7ZQ7_wCHyEWjL4wJvHbS_FLlQ/viewform?usp=sf_link किंवा http://bitly.ws/sAa8 या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन परीक्षेकरीता अर्ज सादर करावयाचे आहेत. वरील चाळणी परीक्षेत पात्र ठरलेल्या युवती व महिलांची पुढील परीक्षा नवगुरुकूल संस्थेद्वारे दुरध्वनीवरुन घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम इंग्लिश मौखिक मुलाखत व दहावी पर्यंतचे गणित असा असेल. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या आणि पालकांच्या मुलाखती घेतल्या जातील ज्याद्वारे महिला व युवतींची अंतिम निवड करण्यात येईल.

         तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक महिला व युवतींनी नोंदणी करुन आपला सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं.210, आमगाव रोड, गोंदिया येथे अथवा दूरध्वनी क्रमांक 07182-299150 किंवा 9284323141 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

blank