
गोरेगाव,दि.17ः शहरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राचे उदघाटन 16 जुलै रोजी शनिवारी आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात आले.नगर पंचायत गोरेगाव स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतग॔त घनकचरा व्यवस्थापण शेडचे लोकार्पन व वाड॔ क्र.01 श्रीरामपूर येथे पाच लाख किमतीच्या सभामंडप बाधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, माजी बांधकाम सभापती हिरालाल रहांगडाले,रेवेंद्रकुमार बिसेन , मन्सु मारबते, मोरेश्वर कांबळे, विकास बारेवार , महेश कटरे, साकेत पालेवार, वामन वरवाडे, अनिल राऊत, गोपीचंद ठाकरे, नंदू पटले, परमानंद चुलपार, डिगेश्वर पटले, दशरथ कावळे, जुगराज राहागङाले, ईमराज कटरे, धनलाल नागपुरे आदी उपस्थित होते.




