33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home रोजगार/व्यापार रोजगारासाठी मिळणार दोन वर्ष निवासी प्रशिक्षण 30 जुलैपर्यंत मुलींनी अर्ज करावे

रोजगारासाठी मिळणार दोन वर्ष निवासी प्रशिक्षण 30 जुलैपर्यंत मुलींनी अर्ज करावे

0
29

वाशिम, दि. 21 : सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिर्व्हसिटी कोवळे, पुणे आणि इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड, रांजणगांव यांच्यामार्फत सीएसआर फंडामधून WINGYAAN जो वंचित विद्यार्थीनींसाठी डिझाईन केलेला शैक्षणिक अभ्यासक्रम आहे. हा कार्यक्रम पुर्णवेळ दोन वर्षाचा डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स कोर्स आहे. युवती व महिलांकरीता रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण व तदनंतर निश्चित स्वरुपाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. हा अभ्यासक्रम सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिर्व्हसिटी कोवळे, पुणे यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संस्थेतील 16 महिन्यांचे शैक्षणिक शिक्षण आणि 8 महिन्यांचे संस्थांमध्ये नोकरीचे प्रशिक्षण व डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स या कोर्सचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

         या अभ्यासक्रमाच्या पात्रतेसाठी वयोमर्यादा 16 ते 19 वर्षाची आहे. दहावी पास, आर्थिकदृष्टया दारिद्रयरेषेखालील मुली व महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. यासाठी 30 जागा उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचा निवासी स्वरुपाचा आहे. या अभयासक्रमासाठी विनामुल्य अभ्यासक्रम एनएसक्यूएफ स्तर 5 वर आधारीत सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील रोजगारभिमुख पदविका अभ्यासक्रम आहे. यामध्ये संस्था शुल्क, निवास आणि बोर्डिंग, वैद्यकीय विमा, गणवेश आणि इतर विविध खर्च समाविष्ट आहे. अभ्यासक्रमामध्ये उत्पादन, गुणवत्ता, देखभाल, पुरवठा साखळी, माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक सुरक्षा, कार्यसंस्कृती टिमवर्क आणि संवाद कौशल्य याचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीव्दारे निवड प्रक्रीया होणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जुलै 2022 आहे.

        युवती व महिलांनी आपले अर्ज अमोल फटाले/अकांक्षा तिवारी, प्लँट सर्व्हिस ॲन्ड ईएचएस फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स, प्रा. लि., बी-19, एमआयडीसी, रांजणगांव, ता. शिरुर जि. पुणे  भ्रमणध्वनी क्रमांक 91-2138673322 किंवा सिम्बॉयसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिर्वसिटी, किवाले ॲडजॉईनिंग, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, पुणे या पत्यावर पाठविण्यात यावा. अधिकमाहितीसाठी या कार्यालयातील प्रतिक बाराहाते यांच्या 9096855798 किंवा अतिष घुगे यांच्या 8390756944 या क्रमांकावर संपर्क साधून अर्जाचा नमुना प्राप्त करुन घ्यावा. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त मुली व महिला उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

blank