33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल:खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण; मुर्मूंना 540, सिन्हांना 208 मते, 15...

राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल:खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण; मुर्मूंना 540, सिन्हांना 208 मते, 15 मते बाद

0
68

blank

नवी दिल्ली--देशाच्या 15 व्या राष्ट्रपतींचे नाव थोड्याच वेळात घोषित होईल. मतमोजणीची पहिली फेरी संपली आहे. त्यात खासदारांच्या एकूण मतांपैकी मुर्मू यांना 540, तर यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळालीत. 15 मते बाद झाली आहेत.

संसदेच्या खोली क्रमांक 63 मध्ये मतमोजणी सुरू आहे. NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मतांचे मूल्य 3 लाख 78 हजार आहे. तर यशवंत सिन्हा यांच्या मतांचे मूल्य 1 लाख 45 हजार 600 एवढे आहे. खासदारांच्या मतमोजणीनंतर आता आमदारांच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे. त्यानंतर विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. दुसरीकडे, मुर्मू यांच्या गावात आनंदोत्सव सुरू झाला आहे.

मुर्मूंना NDA सह शिवसेना, बीजेडी व वायएसआर काँग्रेसचा पाठिंबा आहे. तर यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचे समर्थन आहे.

विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं. आता द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या आहेत..  देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.

18 जुलैला भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकुण 4800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा होता.देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी समाजातील पहिल्या महिला विराजमान झाल्या.

blank