36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home क्रीडा राजमुद्रा ग्रुपच्या पत्राची दखल घेत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची तुमसर येथील क्रीडा संकुलाची...

राजमुद्रा ग्रुपच्या पत्राची दखल घेत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची तुमसर येथील क्रीडा संकुलाची पाहणी

0
50

blank

तुमसर : तुमसर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी क्रिडा संकुल येथील ग्रिन जीमचे बांधकाम मागील कित्येक वर्षापूर्वी करण्यात आले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ती ग्रीन जिम पूर्णतः भंगार अवस्थेत पडलेली होती.
या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे महिला खेळाडूंना व बाहेर गाऊन प्रॅक्टिस साठी व व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना व खेळाडूंना त्रास सहन करावे लागत असल्याचे व प्रॅक्टिस साठी येणाऱ्या मुला-मुलींची विविध समस्या घेऊन भंडारा येथे जाऊन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांच्याशी चर्चा केली होती व नागरिकांना त्रास होत असल्यामुळे तुमसर येथिल क्रीडा संकुलाची  पाहणी करण्याकरिता विनंती केली होती.
 इंजि. सागर गभने यांच्या विनंती वर जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी खेळाडूंना होणाऱ्या त्रासाची दखल घेत तुमसर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे भेट देत क्रिडा संकुलाची पाहणी केली व येथील खेळाडूंना होणाऱ्या विविध समस्या बद्दल माहिती प्राप्त केली.व सर्व खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर मार्गदर्शन करत लवकरच सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
              जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम मॅडम,तालुका क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, क्रिडा अधिकारी पंधराम ,यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुमसर येथील क्रीडा संकुल मध्ये भेट  देऊन सर्व खेळाडूंचे समस्या ऐकून घेतल्याबद्दल सर्व खेळाडूंनी त्यांचे आभार मानले

blank