
गोंदिया,दि.27 : सुझूकी मोटर गुजरात प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गोंदिया येथे 29 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे व त्याच तारखेला साक्षातकार घेणार आहे. करीता वर्ष 2015, 2016, 2017, 2018, 2019, 2020 व 2021 मध्ये फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, टर्नर, मशिनीस्ट, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, टूल आणि डाय मेकर, प्लास्टीक प्रोसेसिंग ऑपरेटर, ऑटोमोबाईल, ट्रॅक्टर मेकॅनिक आणि पेंटर जनरल या व्यवसायातून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेले उमेदवार याकरीता पात्र आहेत. मागील दोन वर्षापासून सुझूकी मोटर या जिल्ह्यात भरती आयोजित करीत असून 250 हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत.
सदरील भरती मेळाव्यात जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे अंशकालीन प्राचार्य, तसेच सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां.) मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गोंदिया यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.




