‘हर घर झेंडा’ चित्ररथाला सभापती, उपसभापतींनी दाखविली झेंडी

0
25

तिरोडा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर झेंडा उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील सर्व गावात १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिक आपल्या घरी झेंडा फडकविणार आहेत. त्यानिमित्त तिरोडा पंचायत समितीच्या सभापती कुंता पटले व उपसभापती हुपराज जमईवार यांनी चित्रफीत रथाचे पुजाअर्चना करून हिरवी झेंडी दाखवून रथाची पंचायत समिती येथून रवानगी केली.

राष्ट्ध्वजाचे अपमान होऊ नये यासाठी आपल्या घरावर तिंरगा कसा लावावा, याबाबत ध्वज संहितेची माहिती या वेळी देण्यात आली. प्रत्येक नागरिकांना ध्वज संहितेची माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने व जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने जनजागृतीपर चित्ररथ तयार करून मंगळवारी तिरोडा पंचायत समितीला पाठविले. या चित्ररथ गाडीचे उदघाटन करून सभापती कुंता पटले् व उपसभापती हुपराज जमईवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रमात खंड विकास अधिकारी सतिश लिल्हारे, विस्तार अधिकारी मनोज बडोले, धारगावे, अनुप भावे, सितेश पटले, भायदे, कुर्वे, बैस, लेखापाल यादव, लाडंगे, बिसेन, सर्व कर्मचारी उपस्थित होते.

तिरंगा ध्वजाबाबत माहिती देणारा हा चित्ररथ तालुक्यातील प्रत्येक गावात फिरून माहिती देईल. तसेच आपल्या घरावर झेंडा लावण्यासाठी नागरिकांना घरांवर तिंरगा लावण्यासाठी प्रोत्साहन देईल. झेंडा कसा लावावा, नियम काय आहेत, संहितेचे पालन कसे करावे, याबद्दलची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी अमृत महोत्सवानिमित्त तिरंगाविषयक नियमांची माहिती संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत.