40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता फर्निचर दुकानदाराचा वनअधिकार्‍यावर हल्ला- दोन आरोपींना अटक

फर्निचर दुकानदाराचा वनअधिकार्‍यावर हल्ला- दोन आरोपींना अटक

0
69

blank

गोंदिया,- वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी अनधिकृतपणे वाहतूक होत असलेल्या सागवान भरलेले ट्रॅक्टर पकडले. याचा रागमनात ठेवून घटनास्थळावर असलेलया वनविकास महामंडळ सालेकसाचे आरएफओंवर दुचाकी चढवून ठार मारण्याचा प्रयत्न मंगळवार, 2ऑगस्ट रोजी सालेकसा शहरात दर्रेकसा मार्गावर घडला. याप्रकरणी पोलिसांनी मालक व ट्रॅक्टर चालकाला अटक केली आहे. अटक करण्यातआलेल्या आरोपींची नावे फर्निचर दुकान मा लक विनोद जैन व ट्रॅक्टर चालक दिनेश कटरे अशी आहेत.
सालेकसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. तालुक्यावर निसर्गान् मुक्तहस्ताने उधळण केली असून मौल्यवान वनसंपदा आहे.तालुक्यातील जंगलाचे संरक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र वनविकास महामंडळावर आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनतस्करीवाढल्याच्या तक्रारी मिळत असल्याने 2 ऑगस्ट रोजी वनविकास महामंडळाचे उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग सालेकसातालुक्याच्या दौर्‍यावर होते.ते त्यांच्यासोबत वनपरित्राधिकारी मंगेश बागडे, वनरक्षक कालेवार होते.ते दरम्यान त्यांना दर्रेकसाकडून सालेकसाकडेअवैधरित्या सागवानची कत्तल करुन लाकडे येत असल्याची माहिती मिळाली.या आधारे त्यांनी शोध घेतला असता तहसील कार्यालयासमोरील विनोद फर्निचर समोर सागवान फरलेला ट्रॅक्टर दिसला.वन अधिकार्‍यांनीट्रॅक्टर चालक दिनेश कटरे याला लाकडे कापण्याचा  वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. यादरम्यानविनोद फर्निचरचे मालक तेथे दुचाकीने आले व दुचाकी आरएफओ मंगेश बागडे यांच्या अंगावर चढविली.यात ते थोडक्यात बचावले. याप्रकरणीमंगेश बागडे यांच्या तक्रारीवरुन सालेकसा पोलिसांनी सागवान भरलेला ट्रॅक्टर जप्त करुन आरोपी विनोद जैन व चालक दिनेश कटरे याला अटककेली आहे.

blank