
राज्य मंत्रिमंडाळाचा 39 दिवसांपासून लांबलेला विस्तार अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात पार पडतोय. त्यात भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, यात वादग्रस्त संजय राठोड आणि अब्दुल सत्तारांचा समावेश आहे. यावरून येणाऱ्या काळात सरकारला टीकेला सामोरे जावे लागू शकते.
Maharashtra Cabinet expansion | Governor Bhagat Singh Koshyari administers the oath of office to 18 MLAs as ministers pic.twitter.com/2eDIBVxWj3
— ANI (@ANI) August 9, 2022
शपथविधी सोहळा…
शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
भाजपकडून गिरीश महाजनांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या डॉ. विजयकुमार गावित यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी विखे-पाटील यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवले आहे
Shiv Sena MLAs Gulabrao Patil and Dadaji Dagadu Bhuse take oath as Maharashtra ministers at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/jkpezoOE1d
— ANI (@ANI) August 9, 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरबार हॉलमधील व्यासपीठावर दाखल. शपथविधी सोहळा सुरू.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरबार हॉलमध्ये दाखल झाले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारावर कसलिही नाराजी नाही. कोणतेही आमदार नाराज नाही, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया.
भाजपचे मंत्री
1. सुरेश खाडे, 2. चंद्रकांत पाटील, 3. राधाकृष्ण विखे, 4. गिरीश महाजन, 5. अतुल सावे, 6. रवींद्र चौहान, 7. विजयकुमार गावित, 8. सुधीर मुनगंटीवार, 9. मंगलप्रभात लोढा
शिंदे गटाचे मंत्री
1. दादा भूसे, 2. संदीपान भुमरे, 3. उदय सामंत, 4. शंभूराज देसाई, 5. गुलाबराव पाटील, 6. अब्दुल सत्तार, 7. संजय राठोड, 8. दीपक केसरकर, 9. तानाजी सावंत
Chandrakant Patil and Vijay Kumar Gavit are among the nine BJP leaders who are taking oath as ministers in Maharashtra Cabinet at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/DCyzwjEVVa
— ANI (@ANI) August 9, 2022
30 जून रोजी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर दोघांनीच मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन पेट्रोलवरील कर कमी करणे, शेतकऱ्यांना अनुदान यांसारखे निर्णय घेतले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नव्हता. त्यामुळे सत्ताधारी आमदारांत धाकधूक वाढली होती, तर विरोधी पक्षांचे नेतेही शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करत होते. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्लीत 6 वाऱ्या झाल्या होत्या.
Maharashtra Cabinet expansion | 18 ministers to be sworn in today at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/1vUX6e2yoy
— ANI (@ANI) August 9, 2022
तेलंगणात 68 दिवस दोघांनीच चालवले सरकार
महाराष्ट्रात 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत असला तरी याआधी तेलगंणमध्ये चंद्रशेखर राव यांनी आपले सहकारी व गृहमंत्री मोहमंद यांच्यासोबत 68 दिवस सरकार चालवले होते. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मंत्रिमंडळ झाल्यानंतर 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देखील विधिमंडळात काल अधिकाऱ्यांची तातडीच बैठक बोलावण्यात आली होती.





